बातम्या

गोकुळ कट्टा’ या मार्गदर्शनपर आशय निर्मिती करणाऱ्या स्टुडियोचे उद्घाटन

Inauguration of Gokul Katta


By nisha patil - 2/24/2025 9:46:18 PM
Share This News:



गोकुळ कट्टा’ या मार्गदर्शनपर आशय निर्मिती करणाऱ्या स्टुडियोचे उद्घाटन

शेतकरी आणि चांगल्या प्रतीचे दुध उत्पादन करणाऱ्यांसाठी माहितीचा नवा केंद्रबिंदू…

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघामार्फत दूध उत्पादकांना त्यांच्या व्यवसायासंदर्भातील सखोल व शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळावे, यासाठी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात ‘गोकुळ कट्टा’ या मार्गदर्शनपर आशय निर्मिती करणाऱ्या स्टुडियोचे उद्घाटन आ.सतेज पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर यांच्या उपस्थितीत झाले. या स्टुडिओद्वारे दुग्ध व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मुलाखती, मार्गदर्शन सत्रे आणि माहितीपर कार्यक्रमांद्वारे मार्गदर्शन करणारी आशय निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या यशस्वी गाथा, दुध व्यवसाय सुधारणा, नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींची माहिती पुरवण्याचा गोकुळ दुध संघाचा मुख्य हेतु असून त्याच अनावरण करण्यात आलंय. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे, गोकुळचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अभिजीत तायशेटे, शशिकांत पाटील- चुयेकर, डॉ. चेतन नरके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


गोकुळ कट्टा’ या मार्गदर्शनपर आशय निर्मिती करणाऱ्या स्टुडियोचे उद्घाटन
Total Views: 42