बातम्या

"यड्राव येथे हेल्दी लाईफस्टाईल फाऊंडेशनच्या साधना मंदिराचे उद्घाटन, डॉ. अमितजी राठी आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत"

Inauguration of Healthy Lifestyle Foundation


By nisha patil - 8/30/2024 3:44:35 PM
Share This News:



यड्राव येथे हेल्दी लाईफस्टाईल फाऊंडेशन च्या साधना मंदिर या वास्तुचे उ‌द्घाटन समारंभ स्वास्थ गुरु डॉ. अमितजी राठी यांच्या हस्ते व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी साहेबांनी फौंडेशनच्या कोणत्याही कामास सहकार्य करू असे आश्वासन दिले व तसेच  हेल्दी लाईफ स्टाईल फौंडेशनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार उल्हास दादा पाटील, अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, नितीन धुत, डॉ. एस. पी. मर्दा, विठ्ठलराव डाके, लक्ष्मीकांत मर्दा गिरीराज मोहता, चंद्रशेखर छाजड, डॉ. ए. के. चौगुले, डॉ. कुबेर मगदुम, संजय सातपुते, शंकर उडपी, नवाले मॅडम, प्रमोद पाटील, सुशांत होगाडे, रामदेव राठी, जिवन घाडगे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


"यड्राव येथे हेल्दी लाईफस्टाईल फाऊंडेशनच्या साधना मंदिराचे उद्घाटन, डॉ. अमितजी राठी आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत"