बातम्या

इचलकरंजीत हायमास्ट दिव्याचे उदघाटन, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे प्रमुख उपस्थितीत

Inauguration of Ichalkaranjit High Mast Lamp


By nisha patil - 2/9/2024 6:48:18 PM
Share This News:



प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाटपुराव्या मुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून डी.के.टी.ई., कलावंत मळा, सांगली रोड, इचलकरंजी येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून आभार मानले.

यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, काकासो नाडगे, बब्रूवार विभूते, तानाजी पाटील, विनोद आवळे, दत्ता कदम, समाधान नेटके, ऋषिकेश धावारे, प्रकाश घाडगे, पिंटू कांबळे, सुरेश पागडे, प्रकश हाताळे, भैया चव्हाण, अमोल नेटके, तुलसीदास चव्हाण, अर्जुन चव्हाण, रणजीत आवळे, सिद्धराम शेखा, अमोल पाटील, सतीश नागरे, दत्तात्रय मोहिते, किशन भोरे, राजू देवकुळे, आरती हाताळे, कलाबाई आवळे, सुनिता हाताळे, लक्ष्मी कांबळे, विमल मदाळे, विमल हेगडे, लक्ष्मी गोरे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


इचलकरंजीत हायमास्ट दिव्याचे उदघाटन, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे प्रमुख उपस्थितीत