बातम्या
कबनूर येथे १५व्या वित्त आयोगातून घेतलेले जेसीबी व इतर वाहनांचे लोकार्पण संपन्न..
By nisha patil - 2/20/2025 6:40:29 PM
Share This News:
कबनूर येथे १५व्या वित्त आयोगातून घेतलेले जेसीबी व इतर वाहनांचे लोकार्पण संपन्न..
कबनूर ग्रामपंचायतीच्या विकास कार्याचे आ. आवडेंकडून कौतुक
कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून नव्याने खरेदी करण्यात आलेल्या जेसीबी व इतर वाहनांचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी कबनूर ग्रामपंचायतीच्या विकास कार्याचे कौतुक करत भविष्यातील योजनांवर मार्गदर्शन केले. नव्याने खरेदी केलेली वाहने गावातील रस्ते सुधारणा, स्वच्छता मोहिम आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कबनूर येथे १५व्या वित्त आयोगातून घेतलेले जेसीबी व इतर वाहनांचे लोकार्पण संपन्न..
|