बातम्या
बच्चे सावर्डे येथे नव्या बस स्टॉपचे उद्घाटन..
By nisha patil - 2/19/2025 1:00:54 PM
Share This News:
बच्चे सावर्डे येथे नव्या बस स्टॉपचे उद्घाटन..
आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण
पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथे संयुक्त युवा तालीम फाऊंडेशनच्या वतीने नव्याने उभारलेल्या बस स्टॉपचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, फाऊंडेशनचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नवीन बस स्टॉपमुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून, गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. संयुक्त युवा तालीम फाऊंडेशनच्या कार्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.
बच्चे सावर्डे येथे नव्या बस स्टॉपचे उद्घाटन..
|