विशेष बातम्या

इंडिया आघाडी व शिवप्रेमींची पोलिसांकडून धरपकड. 

India Aghadi and Shiv lovers arrested by police


By nisha patil - 6/3/2025 2:15:51 PM
Share This News:



इंडिया आघाडी व शिवप्रेमींची पोलिसांकडून धरपकड. 

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज यांच्या विषयी आव्हान कारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटना त्यांना काळे झेंडे दाखवून जाब विचारणार होते. यास आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केलीय.

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक यांच्यासह शिवप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.


इंडिया आघाडी व शिवप्रेमींची पोलिसांकडून धरपकड. 
Total Views: 50