बातम्या

भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी आहे-माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर

India is the motherland of Buddhism


By nisha patil - 10/14/2024 9:08:50 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,  यावेळी कार्यक्रमास्थळी मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी भेट देऊन तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.  यावेळी बोलताना मा.आम.डॉ मिणचेकर म्हणाले भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी आहे तसेच भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात असुन आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो .म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका यासारख्या अनेक देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम आहे. विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला तसेच भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करण्याचे काम केले. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. 

यावेळी.भंन्ते मानंदो गोविंदो, रंगराव पांडे भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर, टी एस कांबळे बौद्ध अवसेस संविधान समिती कोल्हापूर, अंबर बनगे ग्रा.प.सदस्य, कमलताई चोपडे ग्रा.प. सदस्य, रेखाताई डुम.ग्रा.पं सदस्य, रमेश कांबळे ,दगडू कांबळे,आनंदा कांबळे,देवगोड कांबळे,संतोष पटवर्धन,किसन तिरपणकर,रामदास कुरणे,तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते


भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी आहे-माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर