बातम्या
भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला नवा कर्णधार...
By nisha patil - 6/1/2025 10:25:00 PM
Share This News:
भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला नवा कर्णधार...
भारतीय महिला क्रिकेट येत्या 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाचीही घोषणा केलीय. तर बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतलाय. भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळालाय नवा कर्णधार... टीम इंडियाचे कर्णधारपद स्मृती मंधानाकडे देण्यात आलंय.
भारतीय महिला क्रिकेट येत्या 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाचीही घोषणा केलीय. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला या मालिकेत संघात संधी मिळालेली नाही. याशिवाय संघातील आणखी एका वरिष्ठ खेळाडूला विश्रांती देण्यात आलीय. मात्र कामाच्या बोज्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतलाय. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद स्मृती मंधानाकडे देण्यात आलंय. त्यामुळे तिच्याकडे हरमनप्रीतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेत दीप्ती शर्मा टीम इंडियाची उपकर्णधार असेल. राघवी बिश्त आणि सायली सातघरे यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.
भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला नवा कर्णधार...
|