बातम्या
सासू-सासर्यांना लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण...
By nisha patil - 3/17/2025 8:20:07 PM
Share This News:
सासू-सासर्यांना लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण...
डॉक्टर सुनेचा धक्कादायक प्रकार...
बंगळुरू येथील डॉ. प्रियदर्शिनी यांनी आपल्या सासू-सासऱ्यांना छळ केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओत त्या वाद घालत असताना त्यांची मुलगी आजोबांना लाथ मारताना दिसते. या घटनेनंतर कर्नाटक वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉक्टर प्रियदर्शिनी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.डॉ. प्रियदर्शिनी या आपल्या सासू-सासऱ्यांवर अत्याचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता या प्रकरणी कर्नाटक वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांना नोटीस बजावली असून, कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
सासू-सासर्यांना लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण...
|