बातम्या

कुरनुर कोयता हल्ल्यातील जखमी वृध्दाचा मृत्यु.

Injured old man dies in Kurnoor Koyta attack


By nisha patil - 11/7/2024 3:40:05 PM
Share This News:



कागल तालुक्यातील कूरनूर येथे कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुलाब बाबालाल शेख यांचा कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये आज रात्री एकच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी अधिक माहितीअशी की, सोमवारी 8 तारखेला कुरनुर येथील शेखमळा परिसरात गुलाब शेख यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने कोयता मारला.यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम कागल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल. मात्र डोक्यात कोयता अडकल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार चालू असताना गुरुवारी रात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.

या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झालाय.आरोपी अद्यापही फरार आहे.


कुरनुर कोयता हल्ल्यातील जखमी वृध्दाचा मृत्यु.