मनोरंजन
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर फॅशन शो: महिलांसाठी खास पर्व, बाली ट्रीपसह आकर्षक बक्षिसांची मेजवानी
By Administrator - 11/1/2025 3:16:42 PM
Share This News:
इनरव्हीलक्लब ऑफ कोल्हापूर फॅशन शो: महिलांसाठी खास पर्व, बाली ट्रीपसह आकर्षक बक्षिसांची मेजवानी
कोल्हापूर: इन्हेरल क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित फॅशन शो शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बालाजी गार्डन पार्क येथे संपन्न होणार आहे. हा विशेष शो महिलांसाठीच असून यामध्ये सहभागासाठी फी रु. 2000 निश्चित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे फॅशन शोतील प्रथम विजेत्या महिलेस बालीची रोमांचक ट्रीप देण्यात येणार आहे. याशिवाय लकी ड्रॉ, स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज आणि फन गेम्स यांचा समावेश असलेला कार्यक्रम रंगतदार होणार आहे.
विजेत्यांना मानचिन्ह आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला तारा न्यूज मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य करत आहे.
इनरव्हील क्लब कोल्हापूर सनराइजच्या अध्यक्षा स्मिता सावंत मांडरे यांनी सर्व महिलांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर फॅशन शो: महिलांसाठी खास पर्व, बाली ट्रीपसह आकर्षक बक्षिसांची मेजवानी
|