बातम्या
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला सांगून गुंतवणूकदारांची १ कोटी 65 लाखांची फसवणूक
By nisha patil - 2/4/2025 3:27:22 PM
Share This News:
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला सांगून गुंतवणूकदारांची १ कोटी 65 लाखांची फसवणूक
पती-पत्नी विरोधात पुन्हा दाखल
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी 65 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोघा पती पत्नीला अटक केलीय.सागर मारुती माने आणि स्नेहल सागर माने अशी आरोपींची नावे आहेत. फसवणुकीबाबत करवीर पोलिस ठाण्यात सुनिल मनोहर आंबेकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सागर माने आणि स्नेहल माने यांनी फॉरेक्स शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवलेल्या रक्क्मेवर दरमहा 10% व दरमहा 15% जादा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले होते. मात्र पैसे न भेटल्याने फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं.
करवीर पोलिसांनी माने दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.याचा पुढ़ील तपास करवीर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करत आहेत.
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला सांगून गुंतवणूकदारांची १ कोटी 65 लाखांची फसवणूक
|