बातम्या
लोहाची कमतरता
By nisha patil - 9/20/2024 12:04:15 AM
Share This News:
शरीराला लोहाची आवश्यकता असते, कारण ते शरीरातील विविध कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लोहाची कमतरता झाल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, ज्यामुळे थकवा, धाप लागणे आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
लक्षणे:
थकवा: थोडंसं काम केल्यावरही थकवा जाणवतो.
फिकट चेहरा: हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा पिवळट दिसतो.
धाप: पायऱ्या चढताना किंवा साध्या कामात धाप लागणे.
पाय हालवणे: लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींचे पाय अनियंत्रित हालतात.
केस आणि नखांचा अपुरा विकास: शरीर महत्त्वाच्या अवयवांची काळजी घेत असल्याने केस आणि नखांची वाढ कमी होते.
लोहाची कमतरता दूर करण्याचे उपाय:
गूळ आणि शेंगदाणे: नियमितपणे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
अंकुरलेले कडधान्य: दररोज सकाळी खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढवतो.
डाळिंब: कोमट दूधात डाळिंबाचे चूर्ण टाकून पिणे लाभदायक आहे.
बीट: सॅलड, रस किंवा सूपच्या रूपात घेतल्यास लोहाची कमतरता कमी होते.
ओट्स: लोह वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहे.
फळे आणि ड्रायफ्रूट्स: विशेषतः बदाम, जे रात्री भिजवून सकाळी दूधाबरोबर घेता येतात.
व्हिटॅमिन सी: लिंबू, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. लिंबू पाण्यात किंवा सॅलडमध्ये लिंबाचा रस वापरणे फायदेशीर आहे.
आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास लोहाची कमतरता दूर करण्यास मदत होईल.
लोहाची कमतरता
|