बातम्या

.... हीच हसन मुश्रीफ यांची गुरूदक्षिणा काय? खा.सुप्रिया सुळे

Is this Hasan Mushrifs Gurudakshina


By nisha patil - 4/11/2024 10:06:39 PM
Share This News:



सिद्धनेर्ली प्रतिनिधी  पालकमंत्री हसन मुश्रीफ  म्हणतात मा. शरद पवार साहेब यांना  मी गुरुदक्षिणा दिली आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाळीस आमदारांच्या सह्या घेऊन पक्ष फोडण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. शरद पवारसाहेबांना त्यांनी हीच गुरूदक्षिणा दिली काय?असा परखड सवाल खा.सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
     

बामणी (ता.कागल) येथे महिला व युवती स्वाभिमान मेळाव्यात त्या बोलत होत्या.खासदार सुळे पुढे म्हणाल्या, छत्रपती शाहू घराण्याचा वारसा लाभलेला निष्कलंक आणि उच्चशिक्षित उमेदवार एका बाजूला तर ईडीला घाबरून मागच्या दाराने पळून जाणारा उमेदवार दुसऱ्या बाजूला अशी लढत येथे होत आहे. कागल गडहिंग्लज  उत्तूर  विभागाच्या विकासासाठी ताकतीने प्रामाणिकपणे लढणारा की ईडी समोर झुकणारा उमेदवार पाहिजे हे आता स्वाभिमानी कागलकरांनीच ठरवले पाहिजे. तीच विनंती करायला मी आले आहे. परिवर्तन करण्याची क्रांती घडवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. चांगलं काय वाईट काय हे महिलांना चांगलं उमगत. त्यामुळे निष्कलंक आणि पारदर्शी कारभारासाठी समरजीतसिंह घाटगे यांच्या तुतारी घेतलेल्या माणसासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा." 
     

उमेदवार समरजितसिंह घाटगे  म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता दिली.मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून पिढी बरबाद केली.सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी महिला सक्षमीकरण,शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला हे सांगावे.
       

जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, " गडहिंग्लज  उपविभागाची अस्मिता असलेला गडहिंग्लज  साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खाजगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे.मी म्हणेल ती पूर्व दिशा,त्यांची  हुकूमशाही व दडपशाही सुरु आहे.स्वर्गीय श्रीपतराव शिंदे, विक्रमसिंहराजे घाटगे,बाबासाहेब कुपेकर व सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराची स्वाभिमानी जनता हे चालू देणार नाही.

    राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता  घाटगे म्हणाल्या," कागल गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघ कुटुंब मानून समरजीतराजे व आम्ही कार्यरत आहोत. महिला स्वावलंबनासह सक्षमीकरणासाठी पाच वर्ष सातत्याने कार्यरत आहोत. कागल मधील परिवर्तनासाठी समरजितराजेंना दिलेले तुमचे मत वाया जाणार नाही.
   

 यावेळी रणजीतसिंह पाटील, सागर कोंडेकर, शिवाजीराव कांबळे, संभाजीराव भोकरे, शिवानंद माळी,अश्विनी माने, अश्विनी भारांबळे, संगीता लोहार, विजया निंबाळकर,अनुराधा पाटील, अनिता सातुशे, शकीला शहाणेदिवाण, सानिका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील यांनी केले.


स्वाभिमानी जनता गद्दारांना माफ करणार नाही 

जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या,
कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा माणूस मतांसाठी पैसे देतो हे पैसे आले कुठून?कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्याच मागे ईडी लागते.ज्याने भ्रष्टाचार केलाय, लोकांचे पैसे हडपलेत, सभासदांचे गोळा केलेले पैसे  कंपनीत गुंतवून स्वतःच्या खाजगी कारखान्याकडे वळवलेत. पालकमंत्री मुश्रीफांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वार्थ साधण्यासाठी पक्षांतर केले.सगळी सत्ता देणाऱ्या  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हसन मुश्रीफ तुमचा आमचा काय विचार करणार आहेत?राजर्षि  शाहूंच्या भूमीतील स्वाभिमानी जनता अशा गद्दारांना कदापिही माफी देणार नाही.
--
चौकट
 शब्द कागलकरांचा 

 छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलकरांनी पवार साहेबांना कायमच साथ दिली. त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यामुळे त्यांनी नेहमीच कागलचा सन्मान केला.मात्र ज्यांचा सन्मान केला ते स्वार्थासाठी सोडून गेले.त्यामुळे पवार साहेबांनी यावेळी समरजितराजेंना ताकद देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला मोठ्या संख्येने माता भगिनींनी उपस्थिती दर्शवून पाठिंबा व्यक्त केला आहे.समरजित राजेंना आमदार करण्याचा कागलकरांचा शब्द असल्याचा निरोप तुमच्या वतीने मी पवार साहेबांना देत आहे.असे प्रतिपादन खा.सुळे यांनी यावेळी केले


.... हीच हसन मुश्रीफ यांची गुरूदक्षिणा काय? खा.सुप्रिया सुळे