बातम्या
"हे मांजर नव्हे, आमचं बाळच आहे!
By nisha patil - 10/25/2024 4:04:21 PM
Share This News:
आजच्या जगात, जाहिरातींचा उद्देश अनेक प्रकारचा असतो – उत्पादन विकणे, ब्रँड ओळख निर्माण करणे, किंवा काही वेगळे संदेश पोहोचवणे. परंतु एका कुटुंबाने दिलेली जाहिरात ही प्राण्यांवरच्या अपार प्रेमाचा अनोखा संदेश देणारी ठरली आहे.
या जाहिरातीत त्यांनी त्यांच्या लाडक्या मांजराला हरवल्याबद्दलची भावनिक अपील केली आहे. त्या मांजराचं वर्णन करताना, त्यांनी स्पष्ट केलं आहे की, "हे मांजर नसून आमच्या घरातील एक जीवाभावाचा सदस्य आहे. तो आमच्या शिवाय खात, राहत नाही."
त्यांच्या घरातील ही पाळीव मांजर अचानक हरवली आहे, ज्यामुळे त्यांच्या घरात एक पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मते, "कोणी त्याला न्हेलं असेल, तर कृपया आम्हाला आमचं बाळ परत आणून द्या. ते आमच्या घरातील नुसतं मांजर नसून आमचं बाळच आहे."
हे निव्वळ एक प्राणी नसून, कुटुंबासाठी एक जिवंत भावना आहे, त्यांचं प्रेम, त्यांची काळजी यावर भर देत, ही जाहिरात मनाला चटका लावणारी ठरली आहे. कुटुंबासाठी त्यांचं पाळीव प्राणी म्हणजे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग, जो हरवल्यामुळे त्यांना तीव्र दु:ख सहन करावं लागत आहे.
जगात जाहिरातींच्या जगात, अनेक व्यावसायिक संदेश असतात. परंतु प्राण्यांवरच्या प्रेमाची हि जाहिरात ही खास ठरते. हि जाहिरात फक्त त्यांच्या हरवलेल्या प्राण्यासाठी नसून, प्राण्यांच्या आणि मानवाच्या बंधाला सन्मान देणारी आहे. "प्राणी केवळ घरातील एक घटक नसतात, ते आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतात," असा संदेश या जाहिरातीमधून पोहोचतो.
प्रेमाने बांधलेल्या या कुटुंबाच्या भावनांना प्रतिसाद देत, ज्या कोणी हे मांजर पाहिलं असेल त्यांनी त्यांना परत आणण्याची विनंती केली आहे. कोल्हापुरातील रंकाळा तालीम या ठिकाणाहून ही पोस्ट आली असून त्या घरातील कुटुंबीयांनी मांजराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना "आमचं बाळ परत आणून द्या," अशी हाक त्यांच्या हृदयातून आलेली आहे. कृपया हे हरवलेलं मांजर जर कोणाला सापडला असेल तर नक्की या कुटुंबाशी संपर्क साधा आणि त्यांचा आनंद त्यांना परत मिळवून द्या...
"हे मांजर नव्हे, आमचं बाळच आहे!
|