बातम्या
पन्हाळा किल्ल्यावर 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन
By nisha patil - 2/14/2025 11:40:18 AM
Share This News:
पन्हाळा किल्ल्यावर 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन
कोल्हापूर, 13 फेब्रुवारी: केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 19 फेब्रुवारी 2025 रोजी 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन पन्हाळा किल्ल्यावर होणार आहे. या पदयात्रेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची आठवण निर्माण करणे आणि देशभक्तीचा प्रचार करणे आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्याची सूचना देण्यात आली.
पद्यात्रेचा प्रारंभ सकाळी 7.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आभासी उद्घाटनाने होईल, आणि यात्रा 8 वाजता सुरू होऊन 10 वाजता समारोप होईल. यात जवळपास 3,000 विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ आणि खेळाडू सहभागी होणार आहेत. पन्हाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळांवर ही यात्रा होईल, तसेच 395 गावांमध्ये शालेय पदयात्रेचे आयोजन केले जाणार आहे.
पन्हाळा किल्ल्यावर 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन
|