बातम्या

जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता...

Jammu kashmir


By nisha patil - 7/29/2024 2:19:49 PM
Share This News:



जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता...

काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांचा दावा


  भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय भूभागात एकूण 600 पाकिस्तानी सैनिक घुसल्याचा दावा केला जातोय. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ.मजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. 
        
पाकिस्तानचे एसएसजी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण एसएसजी तुकडीने कुपवाडा आणि इतर भागात घुसघोरी केलेली आहे.
          
पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या मुझफराबादमध्ये सज्ज आहेत. या दोन तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यास सज्ज आहेत, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.  याआधी 40 ते 60 दहशतवादी घनदाट जंगल आणि डोंगरी भागातून जम्मूत घुसले असे आम्हाला वाटले होते.

पण आता लेफ्टनंट जनरल शाहीद जिंजुआ यांच्या नेतृत्त्वाखाली 500 ते 600 सैनिकांची एक तुकडी याआधीच जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचे आम्हाला समजले आहे. या सैनिकांकडून भारतीय लष्करावर हल्ले केले जात आहे, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.


जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता...