शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात "वाणिज्य विभागातील नोकरीच्या संधी" या विषयावर व्याख्यान
By nisha patil - 3/13/2025 4:31:16 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात "वाणिज्य विभागातील नोकरीच्या संधी" या विषयावर व्याख्यान
कोल्हापूर, दि. 13 – विवेकानंद महाविद्यालयाच्या IQAC विभाग व वाणिज्य विभागाच्या वतीने "वाणिज्य विभागातील रोजगाराच्या संधी" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी SIBIC, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुर्यकांत दोडमिसे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. दोडमिसे यांनी भारतातील तरुणाईची वाढती संख्या ही अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबत चर्चा करताना त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारंपरिक शिक्षणासोबत AI तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी कॉमर्स विभागप्रमुख प्रा. सनी काळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. आभारप्रदर्शन डॉ. ए. एल. मोहिते यांनी केले. या वेळी प्रा. सतिश चव्हाण, डॉ. यु. डी. दबडे, विविध प्राध्यापक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात "वाणिज्य विभागातील नोकरीच्या संधी" या विषयावर व्याख्यान
|