शैक्षणिक

डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर जॉब फेअरमध्ये 117 जणांना नोकरी

Jobs in Patil Engineering Salokhenagar Job Fair


By nisha patil - 1/2/2025 6:49:46 PM
Share This News:



डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर जॉब फेअरमध्ये 117 जणांना नोकरी

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित जॉब फेअरला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 20 हून अधिक महाविद्यालयांचे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अदाणी ग्रुप, लोढा ग्रुप, बजाज, एसबीआय, जस्ट डायल आणि एल कॉम यासारख्या कंपन्यांचा सहभाग होता.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने आणि प्राचार्य डॉ. सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रम व रोजगार मंत्रालय व जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता केंद्र, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. 90 पदवीधर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.


डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर जॉब फेअरमध्ये 117 जणांना नोकरी
Total Views: 57