बातम्या

हरियाणातील विजयाची जयघोष, वडगावच्या चौकात भाजपच्या आनंदोत्सवाची फुलंझड

Joy of victory in Haryana


By nisha patil - 9/10/2024 11:35:47 AM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हरियाणा विधानसभेत सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता स्थापन केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पेठ वडगाव येथे मोठ्या जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टी हातकणंगले तालुकाध्यक्ष मा. अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतिषबाजी व साखर पेढे वाटप करण्यात आले. वडगाव नगरपालिका चौक विजयाच्या घोषणांनी दणाणून सोडला.

या आनंदोत्सवात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हरियाणातील विजयामुळे उपस्थितांमध्ये जोश आणि उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या रोषणाईत आनंद व्यक्त केला, तर साखर पेढे वाटत एकमेकांचे अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजप सत्ता संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. हरियाणाच्या यशाने महाराष्ट्रात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

विजयाचा हा जल्लोष वडगावमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढील निवडणुकीसाठी नवचैतन्य भरून गेला.


हरियाणातील विजयाची जयघोष, वडगावच्या चौकात भाजपच्या आनंदोत्सवाची फुलंझड