बातम्या
थेट मरीन ड्राईव्हवरुन समुद्रात घेतली उडी
By nisha patil - 7/15/2024 7:00:36 PM
Share This News:
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात एका 23 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ममता कदम असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती अंधेरी येथील रहिवाशी होती. दरम्यान, पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याचं समोर आली आहे.
मरीन ड्राईव्ह य़ेथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने समुद्रातून तरूणीला बाहेर काढून मुंबईतील जी.टी.रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी तपासही सुरू केला होता.
महिलेने समुद्रात उडी मारण्यापूर्वी चौपाटीवर तिची बॅग सोडली होती. त्यातील ओळख पत्रावरून महिलेचे नाव ममता प्रवीण कदम असल्याचे पोलिसांना समजले. ममता ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत कामाला होती. सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र, ती कामावर गेलीच नाही, तिने थेट मरीन ड्राईव्ह परिसर गाठले. यावेळी, इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल समोरील चौपाटीवर ती समुद्रात उतरली होती, इथेच बुडून तिचा मृत्यू झाला.
थेट मरीन ड्राईव्हवरुन समुद्रात घेतली उडी
|