बातम्या
के.ब.हेडगेवार व्याख्यानमालेला सोमवार पासून प्रारंभ
By nisha patil - 3/28/2025 9:23:15 PM
Share This News:
के.ब.हेडगेवार व्याख्यानमालेला सोमवार पासून प्रारंभ
हिंदू व्यासपीठतर्फे आयोजन, तीन व्याख्यानांची पर्वणी
हिंदू व्यासपीठतर्फे दरवर्षी डॉ.केशव बळिराम हेडगेवार व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही व्याख्यानमाला सोमवार (ता.३१) ते बुधवार (ता.२) या कालावधीत होणार आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये दररोज संध्याकाळी ६.३० वाजता व्याख्याने होतील. अधिकाधिक नागरिकांनी व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू व्यासपीठचे कार्यवाह उदय सांगवडेकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. भाजपचे नेते सुभाष वोरा यांनी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर पुढील तीन दिवस ही व्याख्यानमाला घेतली जाते. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक, राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. यावर्षीही अशाच पद्धतीने व्याख्यानमालेचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता.३१) पहिले व्याख्यान इतिहास अभ्यासक आणि प्रसिद्ध नाट्यलेखक नीलेश भिसे यांचे ‘हिंदूरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर होणार आहे. मंगळवारी (ता.१) साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांचे व्याख्यान होईल. त्या संस्कृतीरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची मांडणी करणार आहेत. बुधवारी (ता.२) ऑर्गनायझर या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर हे ‘भारतबोध कथ्य आणि तथ्य’ या विषयी मार्गदर्शन करतील. ही व्याख्यानमाला सर्वांना विनामुल्य असून अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या पर्वणीचा आनंद घ्यावा
के.ब.हेडगेवार व्याख्यानमालेला सोमवार पासून प्रारंभ
|