ताज्या बातम्या

कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Kagal five star MIDC company in a terrible fire


By nisha patil - 8/2/2025 2:12:03 PM
Share This News:



कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये एच. टी. इंडस्ट्रीज नावाने जुन्या टायरवर प्रक्रिया करून कार्बन पावडर तयार करणारी  कंपनी  आहे.

दिवस-रात्र पाळी मध्ये या कंपनीत काम सुरू असते. गुरुवारी मध्यरात्री कंपनीतील एका बाजूस अचानक आग लागली. क्षणात मोठा आवाज होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीतील कच्चा माल, साहित्य, पत्र्याचे छत, जुन्या टायर आगीत जळून खाकझाल्या.

आवाज आणि आगीचे तांडव पाहून कामावरील परप्रांतीय कामगारांनी पलायन केले. कंपनीमधील काही कामगारांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या दाखल झाल्या. सुमारे दोन तासांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.


कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
Total Views: 69