बातम्या
कल्लाप्पाण्णा आवाडे शेतकरी सहकारी साखर कारखान्यास 'सर्वाधिक साखर निर्यात' पुरस्कार
By nisha patil - 11/8/2024 11:04:00 AM
Share This News:
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने आयोजित साखर उद्योग परिसंवाद व कार्यक्षमता पुरस्कार सोहळा २०२२-२३ आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्यात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास २०२२-२३ या हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्रीकृष्ण पाल आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे व केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांना देण्यात आला.
यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कु. सानिया आवाडे दीदी, संचालक सर्वश्री आडगोंडा पाटील, सुकुमार किनिंगे, दादासो सांगावे, सुरज बेडगे, शितल अम्मन्नावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुमेरू पाटील, उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे शेतकरी सहकारी साखर कारखान्यास 'सर्वाधिक साखर निर्यात' पुरस्कार
|