मनोरंजन
कंगना राणौत यांना कोर्टाची शेवटची संधी
By nisha patil - 2/28/2025 5:22:02 PM
Share This News:
कंगना राणौत यांना कोर्टाची शेवटची संधी
अनुपस्थित राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होण्याची शक्यता
मुंबई: सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. गेल्या ४० सुनावणींमध्ये कंगना न्यायालयात अनुपस्थित होत्या, तर जावेद अख्तर नियमितपणे हजर राहिले.
या आठवड्यात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, कंगना पुन्हा एकदा न्यायालयात गैरहजर राहिल्या. यानंतर जावेद अख्तर यांच्या वकिलाने न्यायालयाकडे कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली. कोर्टाने यावर कठोर भूमिका घेत, कंगना यांना हजर राहण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. जर त्या पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत, तर त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते.
कंगना राणौत यांना कोर्टाची शेवटची संधी
|