बातम्या

कोल्हापूर शहराच्या विकासकामांसाठी खासदार महाडिक यांची महापालिका प्रशासनाला निर्देश

Kha mahadik


By nisha patil - 8/16/2024 11:14:11 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील विकासकामांची गती व दर्जा सुनिश्चित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका प्रशासनासोबत सुमारे दीड तास चर्चा केली. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांकडून सध्या सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेतल्यावर, खासदार महाडिक यांनी सर्व विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील रस्ते दुरूस्ती, थेट पाईपलाईन योजनेची वीज पुरवठा समस्या, क्रीडा संकुल, ई बस प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, आणि अन्य विविध विषयांवर चर्चा झाली. खासदार महाडिक यांनी ई बस प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची सूचना केली आणि शहरातील अतिक्रमणावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

सकाळीच्या बैठकीत प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. महापालिकेने जनहिताची कामे सकारात्मक व वेगवान पद्धतीने पूर्ण करावी, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.


कोल्हापूर शहराच्या विकासकामांसाठी खासदार महाडिक यांची महापालिका प्रशासनाला निर्देश