बातम्या
कोल्हापूर गारठला: थंडीचा कडाका वाढला, किमान तापमान 15.5°C पर्यंत घसरलं
By nisha patil - 11/28/2024 7:44:49 PM
Share This News:
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी किमान तापमान 15.5°C नोंदवले गेले आहे. तापमानातील घट आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक गारवा जाणवत आहे. शहरात सायंकाळी सहानंतर थंडीचा जोर वाढत असून, नागरिक उबदार कपड्यांचा आश्रय घेत आहेत. ग्रामीण भागातील तापमान शहराच्या तुलनेत अधिक घसरल्यामुळे आजरा, चंदगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आणि गगनबावडा भागांत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर गारठला: थंडीचा कडाका वाढला, किमान तापमान 15.5°C पर्यंत घसरलं
|