बातम्या

कोल्हापूरच्या सुपुत्राचं मायनगरीत जंगी स्वागत...

Kolhapur boy kusle


By nisha patil - 8/21/2024 2:00:30 PM
Share This News:



कोल्हापूरच्या सुपुत्राचं मायनगरीत जंगी स्वागत...


हेलिकॉप्टर मधून केली पुष्पवृष्टी...

पॅरिस  ऑलम्पिक स्पर्धेतील कास्य पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागतपर मिरवणुकीसाठी महाविद्यालयातील विधार्थी तसेच नागरिक मोट्या प्रमाणात उपस्थित होते. तारा न्युज चावकापासून दसरा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी  करण्यात आली. दरम्यान ऐतिहासिक दसरा   चौक येथे  सन्मान पात्र देऊन सत्कार करण्यात आला.

या समारंभ प्रसंगी पालक मंत्री हसन मुश्रीफ,  खासदार धनंजय महाडिक,छत्रपती संभाजीराजे , आमदार बंटी पाटील,खासदार धेर्यशील माने, आमदार सतेज पाटील,चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूरच्या सुपुत्राचं मायनगरीत जंगी स्वागत...