बातम्या
उद्या कोल्हापूर बंद
By nisha patil - 6/24/2024 1:20:02 PM
Share This News:
कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंच या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्यावेळी कोल्हापूर बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत होते.
दरम्यान, गनिमी काव्याने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळे फासण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मंगळवारी वाहनधारकांनी पुकारलेल्या बंदला यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात जमून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे.कोल्हापूर बंदबरोबरच शहरातील आमदार-खासदारांच्या घरांसमोरही आंदोलन केले पाहिजे, असे पद्मा तिवले म्हणाल्या. बैठकीस महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करावी या मागणीसाठी कोल्हापूर रिक्षा, टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे सोमवारी मध्यरात्रीपासून रिक्षा व टॅक्सी बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दिवसभर रिक्षा बंद राहणार आहे. प्रत्येक तालुक्यात शासन आदेशाची होळी करण्यात येणार आहे.
उद्या कोल्हापूर बंद
|