बातम्या
जिल्हा परिषदेत जिल्हा स्तरीय समन्वय सभेचे आयोजन
By nisha patil - 12/17/2024 11:59:19 PM
Share This News:
जिल्हा परिषदेत जिल्हा स्तरीय समन्वय सभेचे आयोजन
आज जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरीय खातेप्रमुख, गट विकास अधिकारी आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांची समन्वय सभा पार पडली. या सभेत विकासात्मक प्रशासन, यंत्रणा कार्यप्रणाली आणि विविध योजनांच्या अंमलबावणीबद्दल सखोल चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयान यांनी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठक 10 तासांहून अधिक काळ चालली.
सभेत विविध विभागांचे आढावे घेण्यात आले आणि गट विकास अधिकाऱ्यांना विविध योजनांच्या अंमलबावणीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. पशू संवर्धन, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, जल जीवन मिशन व इतर विकासात्मक योजनांची प्रगती यावर चर्चा झाली. यासोबतच कर्मचारी गैरवर्तनाबाबत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गट विकास अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे गुणांकन देखील करण्यात आले. राधानगरी तालुका 86.56 गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर करवीर तालुका 76.52 गुणांसह सर्वात कमी गुणांसह
आहे.
जिल्हा परिषदेत जिल्हा स्तरीय समन्वय सभेचे आयोजन
|