बातम्या
कोल्हापूरकरांना मिळाला दिलासा,पंचगंगा पाणी पातळीत झाली घट
By nisha patil - 7/30/2024 6:15:35 PM
Share This News:
कोल्हापूरकरांना मिळाला दिलासा,पंचगंगा पाणी पातळीत झाली घट
गेल्या २४ तासात पावणे दोन फूट घट ,१० बंदारे खुले
मागील आठवड्यात कोल्हापूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या काही तासांमध्ये पंचगंगा नदीने इशारा पातळी आणि त्यानंतर धोका पातळी ओलांडली.एकीकडे नदीच्या पाणी पातळीत इंचा इनचाने वाढ होत होती तर दुसरीकडे पुन्हा एकदा 2019 ,2021 सारखं महापुराचा संकट ओढावणार अशी टांगती तलवार कोल्हापूरकरांवर होती . राजाराम बंधारा पाणी पातळी शनिवारी 47 फूट आठ इंच इतकी यंदाची उच्चतम पातळी गाठली.मात्र रविवारी पहाटे सहा वाजे पासून पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली.मागील 72 तासात पंचगंगा पाणी पातळी तीन फूट एक इंचाने घट झाली आहेे.सध्या राजाराम बंधारा येथील पाणीपातळी ४४ फूट ७ इंच इतकी आहे. पावसाने घेतलेली उसंत आणि नदीच्या पाणी पातळीत होणारी घट यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.अलमट्टीतूनही रविवारी सव्वातीन लाख क्यूसेक विसर्ग वाढवण्यात आला होता,परिणामी पंचागंगेच्या पाणी पातळीत हळूहळू घट सुरूच आहे.
पंचगंगेचे पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर आज ४४. ७ इंच इतकी असून पंचगंगा धोका पातळी ओलांडून वाहत आहे. दरम्यान जिल्ह्यातील ऐकून ७७ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.आणि १० बंदारे खुले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूरकरांना मिळाला दिलासा,पंचगंगा पाणी पातळीत झाली घट
|