बातम्या

कोल्हापूरला महापुराचा धोका...

Kolhapur was cheated by deluge


By nisha patil - 7/22/2024 12:18:08 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसानं थैमान घातलय .पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय . राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय.धरनातून १४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे ,परिणामी पंचगंगा नदिची पाणीपातळी झपाट्याने वाढलीय . नदीने इशारा पातळी गाठलीय .सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३९ फुटांवर गेलिय. धोखा पातळी ४३ फूट असून नदीची वाटचाल धोखा पातळीकडे सुरु आहे .त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्यात .तसंच सतर्क राहण्याच आवाहन केलंय. तर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून एनडीआरएफ ची एक तुकडी गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात तळ ठोकून आहे.


कोल्हापूरला महापुराचा धोका...