बातम्या
कोल्हापूरच्या तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरव
By nisha patil - 1/26/2025 6:59:28 PM
Share This News:
कोल्हापूरच्या तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरव
आज, २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनी छ. शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) पुणे व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या मराठा, कुणबी-मराठा समाजातील वय वर्षे १८ पूर्ण असणाऱ्या व किमान १० वि. पास असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोफत संगणक कौशल्य योजने अंतर्गत तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, उजाळाइवाडी, कोल्हापूर या केंद्रास सर्वोत्तम कामगिरीसाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
.%5B2%5D.jpg)
त्याचप्रमाणे, यामध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनी सौ. आदिती अक्षय माने यांना विर बाजी पासलकर शिका व कमवा योजनेतील कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, सारथीच्या अप्पर जिल्हाधिकारी मा. श्रीमती किरण कुलकर्णी, मा. तहसीलदार, तसेच MKCL चे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
कोल्हापूरच्या तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरव
|