राजकीय
लाडकी बहीण योजना..जानेवारीचा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या...
By Administrator - 1/15/2025 4:16:44 PM
Share This News:
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यभरातील सुमारे अडीच कोटी लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आहे. जानेवारीचा पंधरवडा उलटूनही हप्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने महिलांनी चिंता व्यक्त केली आहे.
जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या प्रत्येक महिन्यात 1500 रुपये जमा झाले असून, एकूण 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात आले आहेत. मात्र, जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत शासनाकडून कोणताही अपडेट न आल्याने अनेक महिलांनी प्रशासनाकडे याबाबत विचारणा सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजना..जानेवारीचा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या
|