बातम्या

D Mart मध्ये लहान मुलांच्या खाद्यपदार्थात सापडल्या आळ्या

Larvae found in baby food at D Mart


By nisha patil - 7/23/2024 10:00:14 PM
Share This News:



ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळया सापडल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी समोर आलाय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय.मनसेने आक्रमक भूमिका घेत याबाबत डी मार्ट प्रशासनाला जाब विचारलाय.दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.  

 अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्ट मधील विक्री व्यवस्था तात्पुरती बंद केली. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अळया सापडल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील यांनी केलीय. आज  दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. साायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डी मार्टवर कारवाई झाली. विक्री बंद करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात केले होते.


D Mart मध्ये लहान मुलांच्या खाद्यपदार्थात सापडल्या आळ्या