बातम्या
लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र निषेध!
By nisha patil - 2/24/2025 3:09:01 PM
Share This News:
लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र निषेध!
छावा’ चित्रपटाविरोधात रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन
गांधी चौकात घोषणाबाजी
इचलकरंजीतील गांधी चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने केली. पक्षाचे जिल्हा सचिव आयु. सतिश माळगे यांनी "रायाप्पा महार यांचा शौर्य गाथा चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही, हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न आहे,"
असा आरोप केला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने इचलकरंजी येथे ‘छावा’ चित्रपटाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. चित्रपटात रायाप्पा महार यांची भूमिका साकारली नसल्याने बहुजनांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र निषेध!
|