बातम्या

गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ - आम.सतेज पाटील

Leading Milk Union of Gokul State Am Satej Patil


By nisha patil - 7/8/2024 10:37:49 PM
Share This News:



कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज बुधवार दि.०७/०८/२०२४ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ हि संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व मा.मुश्रीफ साहेबाच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे,बचतीचे धोरण अवलंबले आहे.

संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्याना जादा मोबदला देण्यास आम्ही सर्वजन कठीबद्ध असून दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, राज्यात गोकुळने दूध उत्पादकांना सर्वाधिक गाय दूध अनुदान मिळवून दिले आहे.

त्यामध्ये करवीर तालुका आघाडीवर असून करवीर तालुका सर्वच बाबतीत आघाडीवर आहे त्याच पद्धतीने म्हैस दूध संकलन वाढीसाठी करवीर तालुक्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले 


गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ - आम.सतेज पाटील