शैक्षणिक

विवेकानंद  कॉलेजमध्ये  जी. आय. एस. तंत्रज्ञानावर  व्याख्यान

Lectures on Technology


By nisha patil - 2/21/2025 6:00:47 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये  जी. आय. एस. तंत्रज्ञानावर  व्याख्यान

कोल्हापूर दि.21 येथील विवेकानंद महाविद्यालय येथे प्राध्यापक प्रबोधनीच्यावतीने भूगोल विभाग प्रमुख डॉ.जी.एस.उबाळे यांचे 'जीआयएस सुदूर संवेदनांचा परिचय आणि उपयोजन' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी गणित विभागप्रमुख प्रा.एस.पी.थोरात  होते.

व्याख्यानात डॉ. उबाळे यांनी प्रारंभी भूगोलाची व्याख्या सांगून जीआयएस ही संकल्पना स्पष्ट केली. जीआयएस द्वारे भौगोलिक क्षेत्रामध्ये कोणकोणती कामे चालतात याविषयीची उदाहरणे दिली. मानवातील कौशल्य पूर्णतेमुळे जीआयएस प्रणाली व्यवस्थित काम करू शकते. त्याचबरोबर उपग्रहांच्या मार्फत पृथ्वीवरील फोटो घेऊन त्या माहितीचे सर्वेक्षण केले जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी वित्त व जीवितहानी  या तंत्रज्ञानामुळे वाचू शकते.असे जीआयएस तंत्रज्ञानाचे अनेक फायदे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा एस. पी. थोरात यांनी जीआयएस तंत्रज्ञान मानवी  प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.या व्याख्यान सत्राची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. 

            प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्रा. डॉ.एकनाथ आळवेकर यांनी केले. आभार डॉ.डी.बी.दांगट यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.अश्विनी खवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ श्रुती जोशी,प्रा.ए.बी.वसेकर, डॉ. प्रदीप पाटील, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.


विवेकानंद  कॉलेजमध्ये  जी. आय. एस. तंत्रज्ञानावर  व्याख्यान
Total Views: 28