ताज्या बातम्या
राई येथे आढळले बिबट्याचे पिल्लू..
By nisha patil - 6/3/2025 7:22:22 PM
Share This News:
राई येथे आढळले बिबट्याचे पिल्लू..
वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राधानगरी तालुक्यातील राई येथे बिबट्याच्या पिलू आढळून आलय.धामणी धरणग्रस्तांच्या वसाहतीच बांधकाम सुरू असताना या ठिकाणी बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान हे पिल्लू मजुरांना आढळून आलंय. याची माहिती त्यांनी तात्काळ वन विभागाला दिलीय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेतल असून मादी पासून वेगळे झाल्याने ते अशक्त झाल्याचे निदर्शनास आलं. त्याला शेळीच दूध पाजून आधार देण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी केलाय.
दरम्यान बिबट्याच्या मादीचा वेध घेण्यासाठी पिलाला ठेवलेल्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. खबरदारी म्हणून परिसरातील लोकांनी रात्री घराबाहेर पडू नये अस आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलय. मादी बिबट्याला पकडून पिलास सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडण्याचे वनविभागाचे नियोजन आहे.
राई येथे आढळले बिबट्याचे पिल्लू..
|