बातम्या

पेठवडगाव मध्ये साहित्यदिंडी उत्साहात..

Literary excitement in Pethvadgaon


By nisha patil - 6/8/2024 7:01:39 PM
Share This News:



  साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, अण्णाभाऊ साठे लिखित साहित्यांची साहित्यदिंडी पारंपारिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाली.
       

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने व पेठ वडगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी सुमित जाधव त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दिंडीचा शुभारंभ करण्यात आला .          
       

  सामान्यांच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर कार्य केले. आपल्या लेखणीतून लोकांचे प्रश्न आणि व्यथा मांडल्या. ते सोडवण्यासाठी संघर्षही केला. त्यांचे लोककल्याणकारी कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
     

या प्रसंगी जेष्ठ नेते भीमराव साठे,धनाजी सूर्यवंशी,अशोक सूर्यवंशी,जयंती कमिटीचे अध्यक्ष अजित ठुमके, सुशांत आवळे,विनोद दबडे,धनपाल कांबळे, यांसह गावातील नागरिक,समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


पेठवडगाव मध्ये साहित्यदिंडी उत्साहात..