बातम्या
स्थानिक गुन्हे शाखेकडून ९१ किलो गांजा जप्त
By nisha patil - 1/23/2025 5:56:55 PM
Share This News:
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक व करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्या नुसार कारवाई करत असताना सातारा जिल्ह्यातील कराड मलकापूर येथील फैयाज अली मोकाशी हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी मोपेड गाडीने गोवा येथे दहा किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कोल्हापूर शहराजवळच्या उचगाव येथे सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीमध्ये हा गांजा त्याने उंब्रज येथील सोहेल सलीम मोमीन याच्याकडून घेतल्याचे सांगितलं. पोलिसांनी उंब्रज येथे जाऊन सोहेल याला ताब्यात घेतलं.
त्याच्याकडे विचारपूस केले असता त्याने रहीमतपुर इथल्या समीर उर्फ तोसीफ रमजान शेख याच्याकडून गांजा विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी समीर शेख याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून 81 किलो गांजा जप्त केला.
याप्रकरणी तिघाही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळ एकूण 23 लाख 90 हजार रुपये किमतीचा 91 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलीय.
स्थानिक गुन्हे शाखेकडून ९१ किलो गांजा जप्त
|