बातम्या

उद्या राज्यभर एमआयएमची निदर्शने

MIM protests across the state tomorrow


By nisha patil - 7/18/2024 6:37:37 PM
Share This News:



विशाळगडावर झालेल्या गंभीर घटनेनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी १९ जुलै रोजीचा कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. पोलीसांनी विनंती केल्याने उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याचे जलील म्हणाले आहेत. मात्र,  कोल्हापूर दौरा रद्द केला असला तरी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर दुपारी 3 वाजता उद्या एमआयएम तीव्र निदर्शने करणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले. कोल्हापूरमध्ये आणि गाजपूर गावात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीतील सर्व धर्मांच्या लोकांना निषेध नोंदवण्याचे आवाहन केलं होतं. विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार


उद्या राज्यभर एमआयएमची निदर्शने