विशेष बातम्या

रुकडी येथे पंचकल्याण महोत्सवाला आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची भेट

MLA Dr Panchkalyan festival at Rukdi

By nisha patil - 1/23/2025 9:47:13 PM
Share This News:

रुकडी येथे पंचकल्याण महोत्सवाला आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची भेट

रुकडी (दि. 23): रुकडी येथे आयोजित पंचकल्याण महोत्सवाला आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी प्रथम श्री 1008 आदिनाथ भगवान यांची 27 फूट उंच प्रतिमेची स्थापना 51 फूट उंचीवर केली असून, त्याचे दर्शन घेतले.

तसेच, श्री 108 चंद्रप्रभसागरजी महाराज व श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी यांचा आशीर्वाद घेत श्रावक-श्रविकांना अन्नछत्र उभारले होते. या अन्नछत्राला भेट देऊन उपस्थित मान्यवरांनी प्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, ॲड. सुरेश पाटील, शिवसेनेचे पप्पू मुरूमकर, युवा सेनेचे सुरज खोत, ग्रामपंचायत सदस्य पप्पू कांबळे, शीतल चौगुले, जयदीप किनिंगे, अमर आठवले, ओंकार किंनिगे आणि इतर प्रमुख मान्यवर तसेच मोठ्या संख्येने श्रावक-श्रविका उपस्थित होते.

रुकडी येथे पंचकल्याण महोत्सवाला आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची भेट
Total Views: 127