बातम्या

आमदार डॉ .राहुल आवाडे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजींची भेट...

MLA Dr Rahul Awade met Sambhaji Bhide Guruji


By nisha patil - 11/28/2024 7:55:42 PM
Share This News:



आमदार डॉ .राहुल आवाडे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजींची भेट...

 भिडे गुरुजींनी केले आमदार राहुल आवाडे यांचे अभिनंदन

विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री. संभाजी भिडे गुरुजी यांची आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेवून आशीर्वाद घेतला. गुरुजींसोबत होणारी प्रत्येक भेट ही प्रेरणादायी असते. त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन घेतले.*l

याप्रसंगी डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री. संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी संवादाद्वारे गुरुजींच्या विचारशक्तीला प्रोत्साहन दिले आणि समाजातील सर्व स्तरांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याचे वचन दिले. त्यांच्या या भेटीने नवा उत्साह आणि प्रेरणा मिळवली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


आमदार डॉ .राहुल आवाडे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजींची भेट...