बातम्या

आमदार राहुल आवाडे यांचे आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल!"

MLA Rahul Awades historic step for healthcare


By nisha patil - 2/28/2025 5:30:35 PM
Share This News:



आमदार राहुल आवाडे यांचे आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल!"

 इचलकरंजीत सहा नवीन आरोग्य केंद्रांची मंजुरी!

शहरातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, नवीन सहा आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांच्या स्थापनेमुळे स्थानिक नागरिकांना मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, शहराच्या आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे.

ही केंद्रे कलानगर, शाह पुतळा, विक्रम नगर, खंजिरे मळा, आंबेडकर नगर आणि जवाहर नगर येथे सुरू होणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि लवकरात लवकर सुविधा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.

जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून काम करणाऱ्या डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी पुन्हा एकदा समाजासाठी केलेल्या भरीव कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे इचलकरंजीतील नागरिकांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळणार असून, गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये ऐतिहासिक पाऊल उचलणाऱ्या आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


आमदार राहुल आवाडे यांचे आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल!"
Total Views: 39