बातम्या

आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

MLA Rajendra Raut met Manoj Jarange


By nisha patil - 7/18/2024 6:36:05 PM
Share This News:



राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत  यांनी मनोज जरांगे पाटील  यांची भेट घेतली. आमदार राऊत हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज अंतरवाली सराटीत आले होते. मनोज जरांगे पाटील यांचे मागील आमरण उपोषण सोडवण्यासाठी राऊत यांनी मध्यस्थी केली होती. 
           

  आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जाते. आज राऊत यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. दरम्यान काल मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज लगेच आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्यात एका तासापासून अधिक वेळ चर्चा झाली. 20 जुलै रोजी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.


आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट