बातम्या
मनसेची छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी...
By nisha patil - 2/19/2025 7:28:58 PM
Share This News:
मनसेची छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी...
राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
हिंदवी धर्म संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट करमुक्त करून सर्वसामान्य जनतेला संभाजी राजांचा इतिहास अधिकाधिक पाहता यावा . या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी माननीय संजय तेली साहेब यांना आज निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजु दिंडोर्ले , शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विजय करजगार , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत , शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे , संजय चौगुले , उत्तम वंदुरे , निलेश गणेशाचार्य , यतीन उरणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
मनसे कोल्हापूरच्या भावना राज्य शासनाकडे पाठवून छावा चित्रपट करमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी संजय तेलीसो यांनी यावेळी दिले .
मनसेची छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी...
|