बातम्या

खंडपीठाच्या मागणीसाठी मनसेचे दसरा चौकात आंदोलन

MNS protest at Dussehra Chowk for bench demand


By nisha patil - 2/21/2025 5:45:00 PM
Share This News:



खंडपीठाच्या मागणीसाठी मनसेचे दसरा चौकात आंदोलन

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली.

आमरण उपोषणाला पाठिंबा
खंडपीठाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या माणिक पाटील चुयेकर यांना मनसेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

मनसेचा सरकारला इशारा

  • राजू दिंडोर्ले यांनी वकील संघटना, कृती समिती, तालिम संघटना, मंडळे आणि अन्य सामाजिक संघटनांना एकत्र आणून मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • प्रसाद पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमताने खंडपीठाचा प्रश्न लटकवल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री ३०० कोटींची घोषणा करूनही निधी कुठे गेला? असा सवाल उपस्थित केला.
  • पालकमंत्र्यांनी लवकर निर्णय न घेतल्यास मनसे तर्फे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलनात सहभागी नेते आणि पदाधिकारी:
जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, निलेश धुम्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, तसेच रत्नदीप चोपडे, सुनील तुपे, उत्तम वंदूरे, अमित बंगे, राहुल पाटील, सागर साळोखे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 


खंडपीठाच्या मागणीसाठी मनसेचे दसरा चौकात आंदोलन
Total Views: 37