विशेष बातम्या
खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योगासाठी केंद्र सरकारकडे मागणी...
By nisha patil - 3/17/2025 8:18:15 PM
Share This News:
खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योगासाठी केंद्र सरकारकडे मागणी...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष धोरणाची मागणी
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पूर्वीची अनुदान योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
तसेच, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वस्त्रोद्योग व कृषी क्षेत्रात नवसंजीवनी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.खासदार माने यांनी इथेनॉल उत्पादनाला योग्य दर मिळावा, साखरेसाठी वेगवेगळे दर लागू करावेत आणि पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केली. तसेच, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कामात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योगासाठी केंद्र सरकारकडे मागणी...
|