बातम्या

खासदार राहुल गांधींच्या भेटीने संधे कुटुंब भारावले!

MP Rahul Gandhi visit overwhelmed Sandhes family


By nisha patil - 5/10/2024 8:57:19 PM
Share This News:



खासदार राहुल गांधी यांची नुकतीच कोल्हापुरातील अजय कुमार संधे यांच्या घरी भेट सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. साध्या आणि सर्वसामान्य कुटुंबातील अजय कुमार संधे हे टेम्पो चालक असून, त्यांच्या घरी राहुल गांधींनी दिलेली ही भेट अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या प्रसंगी अजय कुमार संधे यांच्या घरात नेत्यांची मांदियाळी जमली होती.

राहुल गांधी यांना पाहुणचार म्हणून संधे कुटुंबीयांनी खास मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी दिली होती. भाजी-भाकरी, वांग्याची भाजी यांसारखे पारंपारिक मराठी पदार्थ तयार करण्यात आले होते, ज्याचा गांधी यांनी आस्वाद घेतला. ही अनपेक्षित भेट संधे कुटुंबीयांसाठी विशेष मानली जात असून, त्यांच्या साधेपणामुळे हे संधे कुटुंब चर्चेचा विषय बनले आहे.

राहुल गांधी यांनी अजय कुमार संधे यांच्याशी दिलखुलास संवाद साधत त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेतले, ज्यामुळे संधे कुटुंबीय अतिशय भारावून गेले.


खासदार राहुल गांधींच्या भेटीने संधे कुटुंब भारावले!